मालेर चक येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 कर्जबाजारीपणाला   कंटाळून मालेर चक येथे शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली.  निळकंठ महागु नैताम (४२)  असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.   
सविस्तर वृत्त असे की मृत निलकंठ महागु नैताम यांच्याकडे अल्प  शेत जमीन आहे.  सततच्या नापिकीमुळे निळकंठ नैताम हा त्रस्त झाला होता . मागील वर्षी  मुलीच्या लग्नासाठी खाजगी लोकांकडून व्याजावर  कर्ज घेतले होते . तसेच वैनगंगा कृष्णा बँकेचे ५९ हजार रुपये कर्ज घेतले आहे.  कर्जाची परतफेड कशी करावी या विचारात नीलकंठ नैताम सापडला होता.  याही वर्षी निसर्गाची साथ मिळत नसल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे पुन्हा तो दुःखाच्या खाईत सापडला . घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे निळकंठ नैताम यांनी स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.  चामोर्शी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेद नसाठी चामोर्शीला पाठवून प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.  पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गंगाधर जुवारे , पोलीस हवालदार राजकुमार चिंचेकर करीत आहेत . मृत नीलकंठ नैताम यांना पत्नी,  दोन मुली,  वडील असा आप्त परिवार आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-14


Related Photos