महत्वाच्या बातम्या

 सविता पुराम यांची विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : जिल्हाचे महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांची विभागीय सल्लागार समिती मधे नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी निर्देशित केल्यानुसार या कार्यालयाचे अधिनस्त शासकिय आश्रमशाळा/अनुदानित आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृहांमध्ये मुलींवर होणारे अत्याचार व गैरप्रकारांना आळा घालण्याचे दृष्टीने शैक्षणिक सत्र २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये शाळा, वसतीगृहांमध्ये भेटी देण्याकरीता विभागीय सल्लागार समिती गठीत करण्यात आली होती.

सदर समितीचे सचिव श्यामलता वटी (स.प्र.अ., प्रशा.) यांचे स्थानांतरण झाले असल्याने त्यांचे ऐवजी शोभा चव्हाण (स.प्र.अ.,प्रशा.) यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच बी.जी. तांबे (सदस्य) व ए.जे.कोल्हे (सदस्य) यांचे देखील स्थानांतरण झाले असल्याने त्यांचे ऐवजी अनुक्रमे दामोधर कुमरे व भारती मानकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच सविता पुराम, सभापती, महिला बालकल्याण, जि.प., गोंदिया यांची समितीमध्ये नव्याने सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत असून नविन विभागीय सल्लागार समिती खालील प्रमाणे गठीत करण्यात आली आहे.

अध्यक्ष आर.एच. ठाकरे (भा.प्र.से.) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर, सचिव शोभा चव्हाण (स.प्र.अ) प्रशासन प्रकल्प कार्यालय, ए.आ.वि. प्रकल्प, नागपूर, सदस्य दामोधर कुमरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बालकल्याण) जि.प. नागपूर, सदस्य भारती मानकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नागपूर, सदस्य शुभदा देशमुख आम्ही व आमचे आरोग्य, कुरखेडा, जिल्हा- गडचिरोली, सदस्य उषा मालविय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमेन चाईल्ड ॲण्ड डेव्हलपमेंट खामला, नागपूर-२५, सदस्य प्रिती ठाकरे गृहपाल, शासकिय आदिवासी मुलींचे वसतीगृह हिवरी नगर, नागपूर, सदस्य वंदना महल्ले मुख्याध्यापिका, इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा गडचिरोली, जि. गडचिरोली, सदस्य सविता पुराम सभापती, महिला बालकल्याण, जिल्हा परिषद, गोंदिया.

जिल्हातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यावेळी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.





  Print






News - Gondia




Related Photos