महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न


- मेळाव्यात ५३२ उमेदवारांची प्राथमिक निवड

- ३ उमेदवारांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयात शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत आज चैतन्य पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय भंडारा येथे जिल्हास्तरीय मेळावा / कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमूख उपस्थितीत घेण्यात आला.

कार्यक्रमात जिल्हयातील नागरीकांना विविध विभागांच्या योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात आला. कार्यकमाचे औचित्य साधून जिल्हयातील सुशिक्षित बेराजगार युवक व युवतींना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांचेद्वारा पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न झाला.

या रोजगार मेळाव्यात नागपूर, वर्धा, भंडारा येथील एकूण ८ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण १ हजार ६८२ पदांकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यात एकूण १ हजार २८१ उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामध्ये १ हजार १४२ उमेदवारांनी प्रत्यक्ष, १३९ उमेदवारांनी गुगल फॉर्मदवारे मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. त्यामधून १ हजार २८१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून ५३२ उमेदवाराची प्राथमिक निवड झाली आहे तर अमोल तेलमासरे, संदीप वंजारी, सुधीर चितांगीया या ३ उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

सदर महारोजगार मेळाव्यात Sunsoor Srushti India Pvt.Ltd Company Wardha, Vaibhav Enterprises Nagpur,  NavKisan Bio Plantec Ltd. Nagpur, Nav Bharat Fertilizers LLP Nagpur, LIC Bhandara, Colossal Skills Pvt. Ltd. (NAPS / NATS Aggregator Nagpur), Mahindra & Mahindra Nagpur, The Universel Group Associate Nagpur. इ. कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक अधिकारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. भंडारा यांनी त्यांच्या महामंडळामार्फत चालणाऱ्या योजनांची समर्पक व सविस्तर माहिती त्यांच्या स्टॉलला भेट दिलेल्या एकूण १६७ उमेदवारांना माहिती दिली. यावेळी अमित सुरेश मने यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत १०.०० लक्ष रूपयांचे कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरू केला, त्यांना महामंडळामार्फत २ लाख ५६ जकार रूपयांचा व्याज परतावा व्यासपाठावर मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते चेक देण्यात आला. जिल्हयातील इतर महामंडळांचेही मेळाव्याच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. त्यांना एकूण ६४९ उमेदवारांनी भेटी दिल्या.

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या एकूण ५२ उमेदवारांचे कौशल्य सर्वेक्षण फॉर्म भरून घेण्यात आले. महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला एकूण ४९५ उमेदवारांनी भेटी देऊन योजनांची माहिती घेतली. तसेच, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची भंडारा येथील ड्रेस मेकींग व्यवसाय मधील मेघा ओमप्रकाश  लोणारे या विद्यार्थीनीने स्वत:चे बुटीक जिल्हा परिषद चौक भंडारा येथे यशस्वीपणे उभारले हे करयाकरीता त्यांनी इंडीयन बँक तकीया वार्ड येथून ३ लाख ७५ हजार रूपयांचे कर्ज घेतले. या कर्जाचा चेक त्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते व्यासपीठावर देण्यात आले.





  Print






News - Bhandara




Related Photos