चटोपाध्याय, वरीष्ठ श्रेणी प्राप्त शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करा


-  शिक्षक समितीचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : 
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार काल १२ जुलै रोजी जिल्याच्या दौऱ्यावर होते. शिक्षक समिती च्या पदाधिकाऱ्यांनी  त्यांची भेट घेऊन चटोपाध्याय/वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झालेल्या शिक्षकीय कर्मचाऱ्यांना राज्य वेतन सुधारणा समिती २००८ च्या  अहवालातील परिच्छेद ३.२७.५ (२) नुसार शासन निर्णय २७ फेब्रुवारी २००९ अन्वये  एकास्तर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. 
 गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासन निर्णय ६ आगस्ट २००२ नुसार एकस्तर पदोन्नती योजना सुरू करण्यात आलेली असून शिक्षक सवर्गांना १२ वर्षानंतर एकाच पदावर काम करीत असल्यास चटोपाध्याय व २४ वर्षे एकाच पदावर काम करीत असल्यास वरिष्ठ निवड श्रेणी मंजूर करण्यात येते. परंतू ही वेतनश्रेणी एकस्तर पेक्षा कमी आहे. यामुळे  शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. जो पर्यंत नक्षलग्रस्त भागात काम करीत आहेत तो पर्यंत एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळणे आवश्यक असतांना सुध्दा जिल्हा परिषद गडचिरोली ने शिक्षकांना शिक्षक संवर्ग आश्वासित प्रगती योजनेत मोडतात असे कारण दर्शवून चटोपाध्याय मंजूर झालेल्या शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करू नये.  त्यामुळे देण्यात आलेले वेतन वसूल करण्यात यावेत. असे पत्र निर्गमित केले आहे. यामुळे एकाच आदेशात नियुक्ती मिळालेल्या पण एकास चटोपाध्याय मंजूर नसल्यास एकस्तर लागू   त्यामुळे मिळणारे वेतन अधिक व ज्यास चटोपाध्याय मंजूर त्यांना वेतन कमी मिळत असल्याने नुकसान होत आहे. 
 परंतु राज्य वेतन सुधारणा समिती २००८ चे अहवालात परिच्छेद ३.२७.५(२) नुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना शिक्षक संवर्गास लागू असणार नाही. अशी शिफारस करण्यात आली होती व सदर शिफारस महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे शासन निर्णय  २७ फेब्रुवारी २००९ अन्वये स्विकृत सुध्दा करण्यात आली असून सुध्दा सदर शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी पासून डावलल्या जात आहे. त्यामुळे सदर शिक्षकांना सुध्दा एकस्तर पदोन्नतीचा लाभ सुरू ठेवण्यास व सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांकडून एकस्तर संबंधाने प्रस्तावित केलेली वसुली थांबविण्यात यावी अशी विनंती शिक्षक समितीने  वित्त मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली.  
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, खिरेंद्र बांबोळे, राजू भुरसे, डंबाजी पेंदाम, रवी वासेकर, जे बी गेडाम, मंगल मानमपल्लिवार, दिलीप नाकाडे, नम्रता मारतीवार, माया गुडेवार, वंदना गुरनुले, महेंद्र वासेकर, राजेश बाळराजे, संजय लोणारे, ओमप्रकाश साखरे, पुरुषोत्तम पीपरे, डी जी तिमा, अनिल मार्तीवार, नागुलावार  ,  रामदास कामेलवार , नरेश जामपलवार,  आशीष जयस्वाल, माणिक वरफडे, श्रीरंग खेवले, संतोष लाजुरकर, संतोष गुट्टे, दिपक केंद्रे, संजय बांडावार, संतोष गोटमुकुलवार , प्रकाश गोपवार, विश्वनाथ बैद्य, तुषार चांदेकर, साखरे सर, मुंद्रेसर, नामदेव बंडावार, वनकर  , राजेश मुलकलवार, सेडमाके  , हरिदास कोकणे दडमल  कळमगांव आदीसह चामोर्शी तालुक्यातील शिक्षक समितीचे सर्व सदस्य गण उपस्थित होते. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-13


Related Photos