नागपूरमध्ये ॲसिडने चेहरा विद्रुप केलेला व एका हात तोडलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
तरुणीचा चेहरा विद्रुप करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे २५ ते ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत पांढुर्णा - नागपूर महामार्गावर सावली फाटा जवळची ही घटना आहे.
स्थानिकांनी सकाळच्या वेळी मृतदेह पाहिल्यानंतर या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. तरुणीची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर ॲसिड फेकून चेहरा विद्रुप करण्यात आला असावा तर तरुणीचा एक हातदेखील तोडला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणीची अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर तरुणीची हत्या दुसऱ्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतर मृतेदह दुसरीकडे फेकला असा पोलिसांचा अंदाज आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2019-07-13


Related Photos