ट्रॅक्टर चोरी प्रकरणात गोवून पोलीस निरीक्षकांनी दिली जीवे मारण्याची धमकी : रविंद्र बारसागडे यांचा पत्रकार परिषदेतून आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : 
 ट्रॅक्टर चोरी प्रकरणात खोटा आरोप लावून चामोर्शी पोलीसांकडून योग्य ती चौकशी न करता मला या प्रकरणात गोवून पोलीस निरीक्षकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप चामोर्शी येथील रविंद्र बारसागडे यांनी आज १२ जुलै रोजी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेतून केला.
 बारसागडे यांनी सांगितले की, ९ एप्रिल रोजी एम.एच. ३४/९३६७ क्रमाकांचा ट्रॅक्टर चामोर्शी येथून चोरीला गेला. सदर ट्रॅक्टर चे  मालक सुधिर गडपायले यांनी  चामोर्शी पोलीस ठाण्यात  माझ्या विरोधात  चोरीची तक्रार दिली.  पोलीसांनी मला बोलावून  माझे बयाण घेतले. प्रकरणाची योग्य ती चौकशी न करता माझ्यावर दबाब टाकून दोन दिवसात चोरीला गेलेला ट्रॅक्टर शोधून आण, अशी तंबी दिली आहे.  ट्रॅक्टर शोधून न आणल्यास तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. पीअीआर घेतल्यानंतर जीवे मारण्याची धमकी पोलीस निरीक्षकांनी दिली आहे, अशी माहिती रविंद्र बारसागडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली. माझ्यावर चोरीचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आल्याने माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय देण्यात यावा, अशी मागणी रविंद्र बारसागडे यांनी पत्रकार परिषदेतून केली.

जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खोटा, गुन्हा दाखल  : पोलिस निरीक्षक बोरकर 

 ट्रॅक्टर  चोरी प्रकरणात रविंद्र बारसागडे यांनी आपल्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे, तो निर्थक व खोटा आहे. या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बारसागडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची योग्य ती चौकशी सुरू असून सखोल चौकशीअंती पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोरकर यांनी दिली. 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-07-12






Related Photos