आदर्श ग्रामनिर्मितीसाठी आता स्पर्धा, २० जुलै पर्यंत प्रस्ताव मागितले


- एक हजार गावे आदर्श म्हणून विकसित करण्याचे ध्येय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
राज्यात आदर्श ग्रामनिर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनची स्थापना केली. त्यामध्ये राज्यातील एक हजार गावे आदर्श म्हणून विकसित करण्याचे ध्येय ठेंवून काम करण्यास सुरुवात केली आहे.या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्रामनिर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलैपर्यंत ग्रामपंचायतीनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील जिल्हा स्वयंमूल्यांकन, मासिक प्रगती अहवाल व विभागाच्या क्षेत्रभेटीदरम्यान बऱ्याच गावांमध्ये सामाजिक, आर्थिक व भौतिक बदल झाल्याचे दिसून येत आहे. या ग्रामपंचायतीना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्राम निर्मितीचे  ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा अभियानात निवड झालेल्या पहिल्या टप्प्यातील ११ जिल्हयासाठी लागू असणार आहे. त्यामध्ये नंदुरबार, वर्धा, गडचिरोली , चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, औंरगाबाद, परभणी, नांदेड, बीड व रायगड या जिल्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
 या स्पर्धेत अंतर्गत ग्रामपंचायतींनी स्व:मूल्यांकन करुन त्याचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयातील संबंधित गट विकास अधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहे. प्राप्त प्रस्तावापैकी अधिक गुण प्राप्त पहिल्या तीन ग्रामपंचायतींची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली जिल्हा तपासणी समिती तपासणी करुन गुणांकन देईल. प्रत्येक जिल्हयातून आदर्श ग्राम म्हणून जास्तीत - जास्त गुणांकन मिळालेल्या तीन ग्रामपंचायतींचा प्रस्ताव राज्य स्तरावर पाठवण्यात येईल. राज्यस्तरावरुन गुणांकन मिळालेल्या गामपंचयातीची राज्यस्तरवरुन तपासणी करण्यात येईली. राज्यस्तरावर सदर ग्रामपंचायतीचे अंतिम गुणांकन करुन संबंधित ग्रामपंचायतींना राज्यसतरावर समारंभपूर्वक रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात येईल. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-12


Related Photos