भंडारा जिल्ह्यात रेती तस्करांवर महसूल व पोलीस विभागाचे धाडसत्र


- ७८ लाख १५ हजार  ६०० रुपयांचा महसूल प्राप्त
- तस्कारांवर ३८ गुन्हे दाखल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा
:  जिल्हयातील अवैध उत्खनन व वाहतुकीवर कार्यवाहीबाबत महसूल विभाग व पोलीस विभागाने  संयुक्त कार्यवाही करून  धाडसत्र सुरु केले.  कारवाईत  ७८ लाख १५ हजार  ६०० रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. 
जिल्हयातील अवैधरित्या रेती उत्खनन व इतर गौण खनिज उत्खननास प्रोत्साहन देणाऱ्या वाहन, वाहनचालक, वाहनमालक तसेच उत्खन्न व उत्खननास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती  वा संस्थेवर खनिज चोरीचे प्रकरण तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नियामांतर्गत शास्ती व दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हयातील वाहतूकीचा मुख्य रस्त्यावर महसूल  व पोलीस विभागाचे संयुक्त तपासणी पथक लावण्यात आले आहे. सदर रस्त्यावर अवैध खनिज वाहतूक करतांना आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. 
जिल्हा भरारी पथकामार्फत मोहाडी तालूक्यातील ढिवरवाडा, बेटाळा, रोहा व भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे धाडी टाकून वाहनासह खनिज  संपदा जप्त करुन संबंधीतांवर शासकीय नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. 

   Print


News - Bhandara | Posted : 2019-07-12


Related Photos