‘सी-प्लेन’ सुरू करण्यासाठी खिंडसी तलाव आणि चंद्रपूर नजीकच्या इरई धरणाचे सर्व्हेक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक खात्याने विदर्भातील विविध तलाव आणि धरणांची पाहणी केल्यानंतर ‘उडान ३.०’ या योजनेअंतर्गत  ‘सी-प्लेन’ सुरू करण्यासाठी रामटेकजवळील खिंडसी तलाव आणि चंद्रपूर नजीकच्या इरई धरणाची निवड केली आहे. या दोन्ही स्थळांचा सव्‍‌र्हे अंतिम टप्प्यात आहे.  
‘सी-प्लेन’  योजनेसाठी केंद्र सरकारचे नागरी वाहतूक खाते, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्यात करार झाला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे या दोन्ही स्थळांचा सव्‍‌र्हे सुरू आहे. एएआय यांच्याकडून सी-प्लेनसाठी ‘स्पेसिफिकेशन’ मिळणार आहे. यासंदर्भातील सूचना पुढील महिन्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी एका तांत्रिक बाबीविषयीचा अभ्यास केला जाणार आहे. या सर्वाचा एकत्रित अहवाल आणि मार्गदर्शक सूचना एमएडीसीला प्राप्त होतील. त्यानंतर एमएडीसी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करेल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.    सी-प्लेन सुरू करून विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.     Print


News - Nagpur | Posted : 2019-07-12


Related Photos