खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेतील ५७ विद्यार्थिनींना विषबाधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी/ अहेरी  : 
 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील  शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेतील  ५७ विद्यार्थिनींना काल ११ जुलै रोजी सकाळी देण्यात आलेल्या जेवणातुन विषबाधा झाली असून या विद्यार्थिनींना अहेरी उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार  खमनचेरु येथीलशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना काल सकाळी १० वाजता जेवण देण्यात आले.जेवणात पत्ता कोबी,आलू भाजी,वरण, भात, पोळी देण्यात आली. मात्र जेवनांनंतर १२ च्या दरम्यान काही विद्यार्थिनींना पोटात मळमळ होणे,उलटाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे १.३० च्या सुमारास रुग्णवाहीकेने विद्यार्थिनींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अहेरी उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळपर्यंत सर्व विद्यार्थिनीवर उपचार सुरु होते.
  वर्ग १ ते १२ पर्यंतच्या एकूण ५७ विद्यार्थिनींना अन्नातुन विषबाधा झाली.विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था पुरुष अधीक्षक ए.एम.मसतकर यांच्याकडे असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस.ए.नन्नेवार यांनी  दिली.घटनेची माहिती  मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर रोहनकर यांनी तपास सुरू केला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-12


Related Photos