'काळवीट' ची शिकार करून केली पार्टी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / औरंगाबाद :
वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी असताना आणि प्राणी वाचविण्याची मोहिम राबवली जात असतांनाच औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे . औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव येथे चक्क 'काळवीट'ची शिकार करून पार्टी करण्यात आली असल्याचं स्पष्ट झाले . या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . ही पार्टी करणाऱ्यांना अटक करून कारवाई करा अशी मागणी होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव शिवारातही ही घटना आहे. 'काळवीट'चं एक पिल्लू शेतात आलं असताना काही युवकांनी पकडून त्याची हत्या केली आणि नंतर त्याचं मटण शिजवून पार्टी केली. त्या काळवीटाला शेतातल्या झोपडीमध्ये आणताना आणि कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . पाऊस सुरू झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. पाणीसाठेही निर्माण झालेत. कळपातून बाहेर पडून हे पिल्लू भटकलं असाव  असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-07-11


Related Photos