दारूतस्करावर कारवाई, १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त


- देसाईगंज पोलिसांची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी / मोरगाव मार्गे देसाईगंजकडे अवैधरित्या दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच गोपनिय माहितीच्या आधारे सापळा रचून देसाईगंज पोलिसांनी दारू तस्कराकडून १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
देसाईगंजकडे पिवळ्या रंगाचे तिनचाकी वाहन येत असून त्यामधून दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. आज ११ जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलिस शिपाई दीपक लेनगुरे, नायक पोलिस शिपाई प्रभु जनबंधू, पोलिस शिपाई राकेश देवेवार, चालक नापोशि राजेश शेंडे यांनी कुरखेडा मार्गावरील टी पाॅईंटजवळ सापळा रचला. यावेळी आलेल्या एमएच ३४ बीएच १४४३ क्रमांकाच्या तिनचाकी वाहनाची पाहणी केली असता देशी दारूच्या ६०० सिलबंद बाॅटला आढळून आल्या. या दारूची किंमत ३६ हजार रूपये इतकी आहे. वाहनाची किंमत दीड लाख रूपये आहे. याप्रकरणी चालक अनिल बंडू हजारे रा. नांदगाव पोडे ता. बल्लारशाह जि. चंद्रपूर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-11


Related Photos