गाडीतील पेट्रोल काढून जन्मदात्या आईला जिवंत जाळले


वृत्तसंस्था / लखनौ : आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे महिला यामध्ये गंभीररित्या भाजली आहे.   तिच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 माहितीनुसार, पीडित महिला संगम पार्कमध्ये राहणारी आहे. मोहन असं तिच्या मुलाचं नाव आहे. घरात झालेल्या वादामुळे तरुणाने गाडीतलं पेट्रोल काढून त्याने आईला जिवंत जाळलं. दरम्यान, मोहन आणि त्याची पत्नी नोकरी करतात. त्यांची १३ वर्षांची मुलगी आहे. आई नातीची नीट काळजी घेत नसल्यामुळे त्यांच्या घरात सतत वाद  होत होते. त्यातून हा प्रकार झाला असल्याचा आरोप खुद्द आरोपी मोहन याने केला आहे.  संपूर्ण प्रकरण गाजियाबादच्या खोडा ठाणे परिसरातलं आहे.  मोहनला दारू पिण्याचं व्यसन लागलं. त्यानंतर त्याने दारूच्या नशेत आईला मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. वाद टोकाला गेल्यानंतर मोहनला राग अनावर झाला आणि त्यानंतर त्याने आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
रागाच्या भरात मोहनने घराच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीतून पेट्रोल काढलं आणि ते आईच्या अंगावर ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आईने आरडाओरड सुरू केल्यानंतर शेजारी धावत आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवल्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. आरोपी मोहनवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. तर पोलीस आता प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
  Print


News - World | Posted : 2019-07-11


Related Photos