महत्वाच्या बातम्या

 आता दर १५ मिनिटांनी मोनोरेल धावणार : वेळापत्रकात बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : देशातील पहिलीवहिली मोनो रेल एमएमआरडीएमार्फत महालक्ष्मी ते चेंबूर धावत असून, मोनो रेलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या ताफ्यातील आणखी एक मोनो रेल प्रवाशांच्या सेवेसाठी चालविण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मिनिटांऐवजी मोनो आता दर १५ मिनिटांनी धावणार आहे.

चेंबूर ते महालक्ष्मी (संत गाडगे महाराज चौक) असा मुंबईतीलच नव्हेतर, देशातील पहिलावहिला आणि एकमेव मोनोरेल मार्ग आहे. तिकीट हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मोनोरेलचे उत्पन्न कमी आहे. प्रवाशांची संख्या वाढावी तसेच उत्पन्नात भर पडावी म्हणून मोनोरेलने प्रायोगिक तत्त्वावर २ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल केला होता.

८ मोनोरेल गाड्यांपैकी ५ गाड्या पूर्वी चालविण्यात येत असत. आता एकूण ६ गाड्या चालविण्यात येत असून, फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. वेळापत्रक बदलल्यानंतर आधीच्या ११८ फेऱ्यांमध्ये २४ फेऱ्यांची भर पडली असून, मोनोच्या १४२ फेऱ्या होत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos