महत्वाच्या बातम्या

 सांघिक एकतेच्या भावनेतून विजयाची प्रेरणा : आमदार डॉक्टर देवराव होळी


- आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे हस्ते इंदिरानगर येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

- गोटूल भूमी चांदाळा रोड येथे भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : क्रिकेट हा सांघिक एकतेचा खेळ असून सहभागी खेळाडूंच्या सांघिक एकतेच्या  भावनेतूनच विजयासाठी प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी इंदिरानगर येथील भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, युवा नेते प्रतीक राठी यांचे सह पदाधिकारी कार्यकर्ते व क्रीडा प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.

इंदिरानगर लायन्स क्रिकेट क्लब इंदिरानगरच्या वतीने चांदाळा रोड गोटुल भूमी इंदिरानगर येथे भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे शुभ हस्ते पार पडला. क्रिकेट हा सांघिकपणे एकत्रित येऊन खेळण्याचा खेळ असून त्या सांघिक एकतेच्या बळावरच स्पर्धेत विजय मिळवता येतो असे प्रतिपादन या उद्घाटनाच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos