टिप्पर च्या धडकेत एक ठार, एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
येथून ८ किमी अंतरावर असलेल्या निष्ठी जवळ मागेहून येणाऱ्या टिप्परने मोटारसायकल ला धडक दिल्याने एक जागीच तर एक जखमी झाला. सदर घटना आज बुधवारी सायंकाळी घडली आहे. 
  मृतकाचे नाव नरेंद्र (प्रद्युम्) दिलीप भोयर (२२) रा.  धानोरा ता.  पवनी जिल्हा भंडारा असे  तर जखमी झालेल्या युवकाचे नाव निखिल अनेश्वर सोनटक्के (२४) रा. धानोरा तह पवनी असे  आहे. दोघेही सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान दुचाकीने  भिवापूर कडून पवनी कडे येत असताना निष्टी जवळ भरधाव वेगाने  मागून येणाऱ्या टिप्पर ने जोरदार धडक दिली. या घटनेत मृतक नरेंद्र याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला निखिल याला हाताला, डोक्याला व पायाला मार लागला असून पवनी येथे प्राथमिक उपचार करून भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
 धडक देणारा टिप्पर हा भिवापूर कडून पवनी कडे भरधाव वेगाने येत होता. त्याने अनेकांच्या गाड्या ना कट मारून निघून गेल्याची चर्चा असून घटना घडताच टिप्पर घटनास्थळा वरून पसार झाला आहे. पवनी पोलिसांना अपघात घडवणारा टिप्पर शोधणे एक आव्हान आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-07-10


Related Photos