बल्लारपूर - आष्टी महामार्गावरील गावाच्या नागरिकांचा रास्ता रोकोचा ईशारा


- कामात दुरस्ती करुन समस्या सोडवा अन्यथा महामार्गाचे काम बंद करुन रास्ता रोको आंदोलन करणार : राजु झोडे 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : 
बल्लारपूर ते आष्टी महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असुन या महामार्गावरिल लगतच्या गावांना ह्या कामाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. समस्याग्रस्त गावकऱ्यांनी सदर कामाबाबत तक्रार करुन निवेदन दिले असुन एका आठवड्यात कामात दुरस्ती केली नाही तर येणाऱ्या १५ जुलै ला संपुर्ण महामार्ग रोखण्याचा ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
 सदर महामार्गावरील लागुन असलेल्या घरांना ह्याचा सर्वात जास्त त्रास होत असुन रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांच्या घरापेक्षाही उंच बांधकाम केल्यामुळे लोकांना घरामध्ये  ये - जा  करण्या करिता रस्ताच उरला नाही. कऴमना ,दहेली,कोठारी ,आमडी , येनबोडी,या गावातील रस्त्यालगतच्या लोकांना आपल्या घरात जायलासुद्धा मोठी अडचन होत असुन लहान मुले, वृद्धांचा जिव धोक्यात आला आहे. लोकांची पाळिव जनावरे सुद्धा घरी न आणता बाहेरच ठेवावे लागत आहे. रस्त्याच्या काठाने उंच उंच नाली बांधकाम केल्याने पावसाचे पाणि व सांडपाणी अंगणात व घरात घुसत असुन मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.  हे फार चुकीचे असुन या महामार्गालगतच्या जनतेचे मोठे हाल होत आहे. विकासाच्या नावाने मोठी पिळवणुक होत आहे.  हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने होत असुन जनतेचे जिवन जगण्याचे स्वांतत्र्य हिरावण्याचा प्रकार सुरु आहे हे फार गंभिर असुन सर्व समस्याग्रस्त ग्रामस्थांनी राजु झोडे यांच्या नेतृत्वात सदर महामार्गचे काम बंद करुन रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा  दिला .
 बांधकाम चुकीचे असुन तात्काळ महामार्ग बांधकामात दुरस्ती करुन या समस्याचे निराकरण करण्यात यावे , करिता महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी राजु झोडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. जर या महामार्गाच्या बांधकामात तात्काळ दुरस्ती करुन जनतेच्या समस्या सोडविल्या नाही तर सदर महामार्गाचे संपुर्ण बांधकामच थांबवुन रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा राजु झोडे व पुरषोतम मोरे, नवनाथ मोरे, सदाशिव थेरे, रविन्द्र टोंगे, विलाश शेडमाके, अरविंद मोरे,दौलत शेडमाके, मदन मोरे, प्रकाश बोंन्डे, बबन उमरे, संतोष भडवे आदी गावकऱ्यांनी सबंधित  प्रशासनाला दिला.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-10


Related Photos