पावसामुळे थांबलेला भारत वि. न्यूझीलंडचा सामना आज पुन्हा खेळवला जाणार


वृत्तसंस्था / मँचेस्टर :    वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पाचवीलाच पुजल्याप्रमाणे पुन्हा पावसाचा व्यत्यय आला आणि ही लढत दुसऱ्या दिवशी खेळविण्याचा निर्णय पंचांना घ्यावा लागला. साखळीतही या दोन संघांची लढत पावसामुळे वाया गेली होती. 
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४६.१ षटकांत २११ धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाचे आगमन झाले. पंचांनी बरीच प्रतीक्षा केली, पण किमान २० षटकांचाही खेळ होणे अशक्य असल्याने राखीव दिवशी सामना खेळविण्याचे ठरले. जिथे खेळ थांबला तिथूनच तो राखीव दिवशी सुरू होईल. पाऊस थांबला तर भारतासमोर कोणते लक्ष्य असेल याविषयी वेगवेगळे अंदाजही व्यक्त केले गेले. आज पुन्हा पाऊस पडला आणि खेळ झालाच नाही तर मात्र साखळीत पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे भारताला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकेल.   Print


News - World | Posted : 2019-07-10


Related Photos