गोंदिया नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता व नियोजन समिती सभापती एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
प्लाॅटचा स्थायी अकृषक परवाना करण्याकरीता ८ हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी गोंदिया नगर परिषदेतील नगर रचना विभागातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता व नियोजन व विकास सभापती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात कडकले आहेत.
शशि छोटेलाल पारधी असे कनिष्ठ अभियंत्याचे तर सचिन गोविंद शेंडे असे नियोजन व विकास सभापतीचे नाव आहे. तक्रारदार हा विमा एजंट असून कुडवा येथे त्यांच्या मालकीचा प्लाॅट आहे. सदर प्लाॅट अकृषक करण्याकरीता नगर परिषेदत आवश्यक  दस्तऐवज सादर केले. त्या प्लाॅटचा स्थायी अकृषक परवाना काढून देण्यासाठी कंत्राटी कनिष्ठ अभियंता शशि पारधी याने ८ हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. 
तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कार्यवाहीचे आयोजन केले. ५ जुलै रोजी कनिष्ठ अभियंता शशि पारधी याने कुडा येथील प्लाॅटचा स्थायी अकृषक परवाना काढून देण्यासाठी लाच रक्कमेची मागणी करून स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तसेच काल ८ जुलै रोजी सापळा कारवाई दरम्यान नियोजन व विकास सभापती सचिन शेंडे याने तक्रारदाराच्या कुडवा येथील प्लाॅटचा  स्थायी अकृषक परवाना तयार करून तक्रारदाराकडे आणून दिल्याबद्दल ८ हजारांच्या लाचेची मागणी केली. यामुळे दोघांविरूध्दही गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त/ पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे, प्रदिप तुळसकर, नापोशि रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, महिला पोलिस शिपाई गिता खोब्रागडे, वंदना बिसेन, चालक देवानंद मारबते आदींनी केली आहे. 

   Print


News - Gondia | Posted : 2019-07-09


Related Photos