देसाईगंज पोलिसांनी दारू तस्करांकडून जप्त केला ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
येथून  आरमोरीकडे दारू तस्करी केल्या जात असलेल्या मारूती सुझूकी एमएच ०१ सीजे ३३३९ क्रमांकाच्या वाहनातून १ लाख ३५ हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. तर वाहनासह एकूण ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल देसाईगंज पोलिसांनी जप्त केला आहे.
दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच काल ८ जुलै रोजी रात्री पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे, पोलिस उपनिरीक्षक हर्षल नगरकर, सहाय्यक फौजदार दयानंद नागरे, पोलिस हवालदार मनोहर गोटा, दिलीप कांबळे, नापोशि दीपक लेनगुरे, सदाशिव धांडे, पोलिस शिपाई प्रमोद सहारे व चालक शंकर बंउे यांनी आरमोरी मार्गावरील निरंकारी भवनाजवळ सापळा रचला. यावेळी एमएच ०१ सीजे ३३३९ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे वाहन आले. वाहनचालकास वाहन थांबविण्यासाठी इशारा केला असता वाहन चालकाने वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. वाहनाची तपासणी केली असता २७ बाॅक्समध्ये २ हजार ७०० बाॅटल दारू आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-09


Related Photos