महत्वाच्या बातम्या

 २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ३७ कलम लागू 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात १० ते २४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, आंदोलने व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच सद्या राज्यात राजकीय घडामोडी पाहता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने१० नोव्हेंबर पासून ते २४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत १९५१ च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी आकाश अवतारे यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.





  Print






News - Bhandara




Related Photos