मायानगरीची ओढ लागलेले दोन अल्पवयीन मुले रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने पोहचले घरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :   
मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न  रंगवीत शाळेच्या  त्रासाला कंटाळून  मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठलेल्या दोन मुलांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी घरी पोहचविले आहे. 
 कसेबसे पैसे जमवून शाळेतून पळून जात  मुंबईत जाऊन मोठे होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी निघालेल्या  अल्पवयीन मुलांचे   बिंग फुटले.  रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने दोन्ही मुलांचे आयुष्य वाचले.  कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी येथील सक्षम नामदेव मोहरकर व समीर रामेश्वर मारवाडे हे गावातील बुटी विद्यालयात ९ व्या वर्गात शिकतात. नियमित शाळेत जाणे व अभ्यासासाठी पालकांनी तगादा लावल्याने त्रस्त झाले. शाळेतही खूप काही अभ्यासात जमत नसल्याने शाळेत त्यांचे मन रमत नव्हते. दोन्ही मित्र असल्याने त्यांनी घरून पळून जाण्याचा बेत आखला. यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. मायानगरीचे आकर्षणाने ते ग्रासले होते. टीव्ही च्या माध्यमातून त्यांना मायानगरीची ओढ निर्माण झाली. मुंबईसारख्या शहरात जाऊन सहज मोठा होता येते हि समज ठेवून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी तयारी केली.
मुंबईला जाण्यासाठी लागणारे पैसे गोळा झाल्यावर त्यांनी शाळेतून पळ काढला. शाळेच्या कपड्यावर गावापासून भंडारा रोड रेल्वे स्टेशन असा प्रवास ऑटो रिक्षाने केला. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकस नजरेत पडले. शाळेचा ड्रेस आणि सोबत कुणीही सोबती नसल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना तत्काळ माहिती दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक विनेक मेश्राम यांनी मुलांना चौकशी करिता ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करताना सदर बालके घरून पळून आल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान पोलिसांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोखले.  खमारीच्या मुख्याध्यापकाशी संपर्क करून पालकांना कळवण्यात आले. मुले घरून पळून घेल्याच्या  धक्याने पालकांनी तत्काळ भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. दरम्यान मुलाची ओळख पटल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पालकाच्या स्वाधीन केले. 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-07-09


Related Photos