सेवानिवृत्त वन अधिकाऱ्याच्या घरात आढळले बिबट्याचे कातडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी  देवेंद्र चकोले यांच्या घरी आज  सोमवारी सकाळी  बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. 
सेवानिवृत्तीनंतर देवेंद्र चकोले  यांच्या घरातील सामान अन्यत्र हलविण्यात येत होते. यावेळी हा  प्रकार उघडकिला आल्याची प्राथमिक माहिती आहे. आठ दिवसांपूर्वीच चकोले सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या घरी कातडे कुठून आले व ते घरी ठेवण्याचे काय कारण, याचा तपास सुरू झाला असून डीएफओ विवेक होशिंग  तपास करीत आहेत.   Print


News - Bhandara | Posted : 2019-07-08


Related Photos