शंकरपूर वनक्षेत्रातील मेटेपार गावालगत वाघीण व दोन बछड्यांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चिमूर
:  चिमूर वनपरीक्षेत्रांतर्गत शंकरपूर वनक्षेत्रातील मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. यात एक वाघीण व तिचे दोन बछडे असून ते आठ ते नऊ महिन्याचे आहे. मेटेपार गावालगत असलेल्या तलावाकाठी काहीजण  जांभळं तोडायला गेले असता त्यांना तेथे वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले.
त्यांनी तत्काळ ही माहिती शंकरपूरच्या पर्यावरणवादी मंडळाच्या अमोद गौरकर या वन्यजीवप्रेमीला दिली. अमोद गौरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जवळच एक चितळ मृतावस्थेत आढळून आले. या चितळाचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या वाघिणीने व तिच्या बछड्यांनी या मृत चितळाला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन ते मृत झाले असावेत असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.   ब्रह्मपुरी वनविभागाचे डीएफओ कुलराज सिंग, चिमूरचे वनपरिक्षेत्र अदिकारी चिवंडे घटनास्थळी दाखल झाले आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-08


Related Photos