महत्वाच्या बातम्या

 गट प्रवर्तक व आशा संपा बाबत आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा  


- गट प्रवर्तक मागणी पूर्ण न झाल्यामुळे संप सुरुच : १६ व्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय समोर विशाल धरणे आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने दखल न घेतल्याने संयुक्त कृती समिती द्वारे आशा गट प्रवर्तक राज्यव्यापी १८ ऑक्टोबर पासुन संप सुरु होता. त्या अनुषंगाने मुंबई येथे१ नोव्हेंबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत, आयुक्त धीरजकुमार आरोग्य अभियान, आरोग्य प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य अतांत्रिक संचालक सुभाष बोरकर यांच्या उपस्थितीत आशा गट प्रवर्तक प्रश्नावर सविस्तर चर्चा कृती समिती पदाधिकारी यांनी केली. 

बैठकीत आरोग्य मंत्री यांनी आशा ना दरमहा ७ हजार रूपये मानधन वाढ करण्यात येईल. तसेच गट प्रवर्तक ना ६ हजार २०० रू. वाढ करण्यात येईल. तसेच  दीपावली भाऊबीज भेट २ हजार देण्यात येईल. तसेच आशा ना मोबाईल रिचार्ज भत्ता १०० रू वरून ३०० रु, जननी सुरक्षा योजना मध्ये सरसकट लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 

२०१८ पासून केंद्र सरकार ने आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ दिली नाही. त्या बाबत राज्यसरकार केन्द्र सरकार ला केंद्राने मोबदला वाढ द्यावी. अशी शिफारस करेल. आरोग्य वर्धिनी चा लाभ गट प्रवर्तक सुद्धा मिळेल, या निर्णयाचे कृती समिती स्वागत करत आहे.

मात्र गट प्रवर्तक गेलीं १८ वर्ष फक्त प्रवास भत्ता वर काम करत आहे. कंत्राटी ऑर्डर असून सुद्धा  सामाजिक सुरक्षा लागू नाही. त्यांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या व त्या प्रमाणे वेतन लागू करा, उच्च शिक्षित गट प्रवर्तक ना किमान वेतन द्या, यासाठी कृती समिती आग्रही आहे. शासनाने गट प्रवर्तक ना न्याय द्यावा अशी विनंती शासनास करित आहोत. गट प्रवर्तक मागणी पूर्ण होई पर्यंत संप सूरू राहील असा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत कृती समिती चे राजू देसले, विनोद झोडगे, एम ए पाटील, शंकर पुजारी, आनंदी अवघडे, भगवान देशमुख, सुवर्णा मेतकर, प्रतिभा कर्डक, अर्चना गडाख, सुवर्णा गांगुर्डे, माया घोलप, सुवर्णा लोहकरे, सुरेखा खैरनार, सविता हगवणे, पाटील उपस्थित होते.

परंतु योग्य तोडगा न निघाल्याने आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आयटक च्या नेतृत्वात १६ व्या दिवशीही विशाल जील्हाव्यापी धरणे आंदोलन करून संप सुरू ठेवण्याचा निर्धार राज्य सचिव विनोद झोडगे यांनी घेतला आहे.

यावेळी आंदोलनात रवींद्र उमाटे, प्रदीप चिताडे, राजू गैंनवार, निकीता नीर, फर्जना शेख, सुहासनी वाकडे, मीना चौधरी, ज्योत्स्ना ठोंबरे, सुनंदा मुलमुले यासह जिल्हाभरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos