आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना लागल्या मार्गी


- पाणीपुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला निर्णय
- आ. कृष्णा गजबे यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक कालावधीपासून मंजूरीविना तसेच मंजूरी मिळूनही कार्यान्वित न झालेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लागणार असल्याची माहिती आ. कृष्णा गजबे यांनी दिली आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आ. कृष्णा गजबे यांनी पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पाणीपुरवठा योजनांचा विषय उपस्थित केला. या बैठकीला सबंधित खात्याचे सचिव तथा उपसचिव उपस्थित होते. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित योजना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश मंत्र्यांनी सचिवांना दिले. यामध्ये सावंगी, कसारी, शंकरपूर, कोरेगाव, वैरागड, वघाळा, बेतकाठी या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. या कामांना मंजूरी प्राप्त झाली आहे. सदर पाणीपुरवठा योजनांना मंजूरी दिल्याबद्दल आ. गजबे यांनी ना. लोणीकर यांचे आभार मानले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-07


Related Photos