काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू ; ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा दिला राजीनामा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस श्रेष्ठींकडे सुपूर्द केला. 
शिंदे यांनी टि्वट करून राजीनाम्यासंदर्भातली माहिती दिली आहे. 'जनतेचा कौल स्वीकारून आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी सरचिटणीसपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे . त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला जबाबदारी दिली, आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार.' असे त्यांनी आपल्या टि्वट मध्ये  लिहले आहे.   Print


News - World | Posted : 2019-07-07


Related Photos