पीएनबी बँकेत पुन्हा ३ हजार ८०० कोटींचा घोटाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने कोट्यवधींचा चुना लावून परदेशात फरार झाले आहेत. आता पुन्हा पीएनबी बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. भूषण पॉवर ऍन्ड स्टील या कंपनीने 3 हजार 800 कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बँकेने या कंपनीच्या विरोधात आरबीआयकडे केली आहे.
कंपनीने कर्ज देण्यार्‍या बँकांच्या समुहाकडून निधी गोळा करण्यासाठी दस्तएवज आणि खात्यामंध्ये हेराफेरी केली आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ही बाब समोर आली आहे. या प्रकरणी बँकेने आरबीयसह शेअर बाजारत ही माहिती दिली आहे. बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेत म्हटले की, फॉरेन्सिक ऑडिट करून कंपनी  आणि अधिकार्‍यांच्या विरोधात ३ हजार ८०५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा अहवाल दिला आहे.  Print


News - World | Posted : 2019-07-07


Related Photos