वडसा- कुरखेडा मार्गावर सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने महिलेस चिरडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
काल खासगी बस व ट्रकमधील नदीपुलावरील अपघाताची चर्चा संपत नाही तोच आज कुरखेडा मार्गावर सिमेंटचे ओझे वाहून नेणाऱ्या ट्रकमधे दबून एका महिलेचा मृत्यू झाला.सुदैवाने तिचा सोबत असलेला तिचा मुलगा यात बचावला आहे .
प्राप्त माहितीनुसार , भैय्याजी विस्तारि वाघाडे ( ४० ) रा. तुळशी हे आपल्या आई सोबत वालोम्बा विस्तारि वाघाडे ( ७०) रा.तुळशी हिला घेऊन आठवडी बाजाराकरिता आपल्या दोन चाकी वाहन क्र.MH.३३.J.३५२४ ने कुरखेडा कडून देसाईगंजकडे येत असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात अचानक विरुद्ध दिशेने येणारे वाहन बघून स्वतःच्या बचावासाठी दुचाकीचा ब्रेक मारल्याने बाजूने जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक क्र. MH.३४ .AP.१९८६ मध्ये तोल गेला असता यात वालोम्बा वाघाडे हि ट्रकमधे दाबल्या गेली व तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता कि महिलेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला , तर मुलगा भैयाजी वाघाडे हा किरकोळ जखमी असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे उपचाराकरिता नेण्यात आले.
मुख्यमार्गावर अपघात स्थळावर बघ्यांची गर्दी जमल्याने काहीकाळ मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. देसाईगंज पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करत शवविच्छेदनासाठी ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविले व सदर ट्रक आणि ट्रकचालकाला  ताब्यात घेतले असून  पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहे.
 देसाईगंज येथे दर रविवारला आठवडी बाजार भरत असतो. ठिकठिकाणाहून व गावखेड्यातून असंख्य लोक भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी शहराकडे येत असतात. अशातच वाहतुकीची कोंडी व लोकांच्या वर्दळीत अनेक लोक हयगयीने वाहन चालवीत असतात.अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून परिसरातील लोकांनी खबरदारीने गाडी चालविणे व आपल्यामुळे कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-07


Related Photos