शालेय पोषण आहारात ऑक्टोबर पासून थापल्या जाणार भाकरी !


- शालेय पोषण आहारात २५ टक्के तांदूळ कपात करून त्याऐवजी ज्वारी , बाजरी ,नाचणी देण्यात येणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नंदोरी :
शालेय पोषण आहार योजना ही केंद्रशासन पुरस्कृत असून राज्याकरिता १ ते ५ व ६ ते ८ वी करीता मंजूर विद्यार्थी संख्ये नुसार प्रति विद्यार्थी ,प्रति दिन अनुक्रमे १०० ग्रॅम व १५० ग्रॅम प्रमाणे तांदूळ अथवा इतर धान्य मंजूर केले जाते. शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांचे आहारामध्ये विविधता येण्याचे दृष्टीने तांदळाची मागणी २५ टक्क्यांनी कमी करून त्या ऐवजी ज्वारी , नाचणी व बाजरी या धान्याचा वापर ऑक्टोबर पासून  करण्याबाबतचा  आदेश नुकताच राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी निगर्मित केला आहे. मात्र या आदेशाने यापुढे शाळांत शालेय पोषण आहार अंतर्गत भाकरीही थापाव्या लागणार असल्याच्या प्रतिक्रिया जनमाणसात व्यक्त होत आहेत.
राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद ) डायट चे प्राचार्य यांची शिक्षण परिषद मुख्य सचिव शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेत अलिबाग येथे ५ ,६ जून रोजी संपन्न झाली या परिषदे मध्ये शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात विविध मुद्यावर चर्चा होऊन त्याअनुषंगाने योजनेची प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. त्यात शालेय पोषण आहार अंतर्गत जिल्ह्यांनी तांदळाची मागणी २५ टक्क्यांनी कमी करून त्याऐवजी ज्वारी , बाजरी व नाचणी या धान्याचा वापर करून विविध पदार्थ पाककृती जिल्हास्तरावर निश्चित करण्याचे सुचविण्यात आले. 
ज्वारी , नाचणी व बाजरी या धान्याचा वापर करून विदयार्थ्यांना देण्याकरिता विविध पदार्थ व पाककृती जिल्हास्तरावर निश्चित झाल्यानंतर त्यानुसार ज्वारी , नाचणी व बाजरी ची माहे ऑक्टोबर १९ ते मार्च २० पर्यंतची मागणी शाळांनी इयत्ता तपशील, पटसंख्या , शाळेचे कार्य दिवस ,(ज्वारी ,नाचणी ,बाजरी ) विहित नमुन्यात नोंदविण्याचे कळविण्यात आले आहे, मात्र या आदेशाचे अंलबजावणीने यापुढे शाळांत भातासोबत ज्वारी, बाजरी, नाचणीची सर्वपरिचित पाककृती ' भाकरी ' चा समावेश होणार असल्याने यापुढे शाळेत भात शिजविण्यासोबत 'भाकरी ' थापाव्या लागणार आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-07


Related Photos