सेक्सला नकार दिला म्हणून पत्नीची हत्या, स्वतःचे गुप्तांगही कापले


वृत्तसंस्था / सिद्धार्थनगर :  सेक्सला नकार दिला म्हणून रागाच्या भरात पत्नीची हत्या करून एका इसमाने स्वत:चेच गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपी अनवारूल हसनविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनवारूल हसन हा सिद्धार्थनगर जिल्ह्यातील काकरा पोखरचा रहिवाशी असून सुरत येथे काम करतो. वर्षभरापूर्वी त्याचं मेहनाजशी लग्न झालं होतं. सुरतहून सुट्टीसाठी तो घरी आला होता. घरात कोणीच नसताना त्याने मेहनाज जवळ सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. मेहनाजने नकार देताच त्याने मेहनाजचा खून केला आणि नंतर स्वत:चे गुप्तांग कापले. या दोघांच्याही किंकाळ्या ऐकून घराबाहेर शेजारी जमा झाले. सारा प्रकार लक्षात येताच त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी मेहनाजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून जखमी अनवारूल हसनला बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पिताळात दाखल करण्यात आलं आहे.  रागाच्या भरात आपण हे कृत्य केलं असल्याची बाब अनवारूल हसन याने कबूल केली आहे. तर मेहनाजच्या वडिलांनी अनवारूल तिचा वर्षभरापासून हुंड्यासाठी छळ करत असल्याची माहिती दिली आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-07-07


Related Photos