ऑनलाईन मागितला मोबाईल मिळाले साबण !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / मुल  :
  ऑनलाईन शाॅपिंग संकेतस्थळाची सध्या जबरदस्त चलती आहे. आकर्षक सवलती आणि भेटवस्तूमूळे ग्राहकांच्या आभासी रांगाच तिथे लागलेल्या असतात. मात्र नेकदा या संकेतस्थळावरून ग्राहकाची फसवणूक सुध्दा होते. अशीच एक फसवणुकीची घटना मूल शहरात घडली. फसवणूक झालेल्या युवकाचे नाव राहूल वाढई असे आहे. सध्या तो नोकरीसाठी नागपूरात स्थायिक आहे. त्यांनी अमरावतीत राहणाऱ्या आपल्या पत्नीसाठी २७ जून ला एमआय च्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन मधून एमअय चा मोबाईल बुक केला . मात्र २ जुलै रोजी पार्सल आले तेव्हा त्या पार्सलमधून मोबाईल ऐवजी अंघोळीच साबण निघाला. यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घेण्याची गरज आहे.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-07


Related Photos