करोडो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा सह अन्य एका आरोपीस न्यायालयीन कोठडी


-  नागपूर येथील कारागृहात रवानगी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /   देसाईगंज :
येथील  राजेंद्र वार्डात ब्यॅुटी पॉर्लरच्या आड अत्यल्प किंमतीत महागड्या वस्तु देण्याचे आमिष दाखवुन  १ कोटी ९२ लाख ५ हजार रुपयाने गंडविणाऱ्या आरोपी शबाना उर्फ शिफा राज मोहमद चौधरी व तिचा भाचा निसार अहमद रोजनअल्ली चौधरी या दोन आरोपींना  पंधरा जणांच्या साक्षबयाणावरुन  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांचीही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात  रवानगी  करण्यात आली आहे.
  देसाईगंज पोलीस स्टेशन मध्ये नोंद असलेल्या अपराध क्रमांक १३०/२०१९ नुसार भादंवि ४२०,३४ या गुन्हयात  १ जुलै ला गुंतवणूकदारांचे हित आणि अधिकार यांचे संरक्षण, एमपीआयडी कायद्यांतर्गत एफआयआर मध्ये वाढ करुन  नागपूर येथील  न्यायालयात  दोन्ही अटक आरोपींना हजर करण्यात आले होते. त्यात या दोन्ही आरोपी ला ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.आज या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली  आहे.
  तपास अधिकारी पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे यांनी  दोन्ही आरोपीना अटक केल्यानंतर पंधराजणांच्या साक्षबयाणावरुन १ कोटी ९२ लाख ५ हजार रुपयाची फसवणुक केल्याबाबत यातील मुख्य आरोपी राज मोहमद चौधरी हा अद्यापही फरार असुन त्यास अटक करणे, गुंतवणुकदाराकडुन जमा रक्कम जप्त करणे, या गुन्हयात कोणी सामील आहेत काय? जप्त दस्तावेज बाबत नमुद विचारपुस करणे, जप्त कागदोपत्रात संशयीत इसमाचे नावाचे अनुषंघाने तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.  त्यामुळे  या दोन्ही अटकेतील पोलीस कोठडी दरम्यान देसाईगंज शहरातील पाच संशयीत व आरमोरी येथिल एक संशयीत असे एकुुण सहा जणांच्या घराची झाडा-झडती बाबत न्यायालयाकडुन सर्च वारँट घेतलेला होता. त्यानंतर आता या प्रकरणात गुंतवणुकदारांना प्रलोभन दाखवुन गुंतवणुक करण्यास भाग पडणाऱ्या जवळपास तीस एजंटाना विचारपुस करणे सुरु असल्याचे सांगीतले जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-06


Related Photos