वैनगंगा नदीच्या पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस - ट्रकचा अपघात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  देसाईगंज  :
नागपूरच्या  दिशेने प्रवासी घेऊन जात असलेल्या  खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस क्र. एमएच .४९ जे .६८५४  व ब्रह्मपूरी कडून देसाईगंजकडे येणाऱ्या ट्रक क्र. युपी ०७ एफटी ४६४७  ची एकमेकांना समोरासमोर धडक बसल्याने मोठा अपघात झाला. यात बसचालकासह एक प्रवासी जखमी झाला. 
 सविस्तर वृत्त असे की आज ६ जुलै रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजताच्या दरम्यान देसाईगंज येथून प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बस व ट्रक मधे भीषण अपघात झाला.  यात खासगी बस चालकाला गंभीर मार लागला व एक प्रवासी सुद्धा जखमी झाल्याने त्यांना तात्काळ घटनास्थळावरून  प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात देसाईगंज येथे हलविण्यात आले.  हा अपघात अगदी वैनगंगा नदीच्या पुलावर मधोमध झाला असून अपघातात जिवीतहानी झाली नाही. परंतु नदीच्या पुलावर अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तात्काळ देसाईगंज पोलिसांनी व वाहतूक विभागाने धाव घेत बचावकार्य सुरू केले. वृत्त लिहीतपर्यंत दोन्ही वाहनांना देसाईगंज पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-06


Related Photos