महत्वाच्या बातम्या

 आश्रम शाळा ताडगाव येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ताडगाव येथे मंगळवार ३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस.एल.धंदर, प्रमुख पाहुणे सर्व शिक्षकवृंद यांच्या शुभहस्ते भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्या मार्फत राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय एकता रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राष्ट्रीय एकात्मतेवर घोषणा देऊन उत्साहात रॅली काढली गेली. रॅली नंतर शाळेत एकता दिवस अंतर्गत पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, परीसर स्वच्छ्ता इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धंदर, अधिक्षक पाझारे, अधीक्षिका चल्लावर, कटलावार, सिडाम, तुपट, कांबळे, थोटे, गजभिये, जनबंधू , कुमरे, वनकर, निमडर, गेडाम, उईके, वालदे, जांभूळकर, धूर्वा, सरकार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos