माकप कार्यकर्ते के. पी. रवींद्रन यांची तुरुंगात हत्या केल्याप्रकरणी भाजप आणि आरएसएस च्या नऊ कार्यकर्त्यांना जन्मठेप


वृत्तसंस्था /  कन्नूर (केरळ) :  माकप कार्यकर्ते के. पी. रवींद्रन यांची कन्नूर तुरुंगात  हत्या केल्याप्रकरणी थालास्सेरी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं शुक्रवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नऊ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देशातील तुरुंगात झालेली ही पहिली 'राजकीय हत्या' होती, असे बोलल्या जाते. 
६ एप्रिल २००४ रोजी कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या आरएसएस आणि भाजपशी संबंधित कैद्यांच्या गटानं माकप कार्यकर्ते के. पी. रवींद्रन यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले.  तेथे त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी थालास्सेरी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं पवित्रन, फाल्गुनन, के. पी. रेघू, सनल प्रसाद, पी. के. दिनेश, के. ससी, अनिल कुमार, सुनी आणि अशोकन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच प्रत्येकी १ लाख रुपये दंडही ठोठावला आहे. रवींद्रन यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तुरुंगात कैद असलेल्या भाजप - आरएसएसच्या सर्व ३१ कार्यकर्त्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, त्यातील नऊ जणांनाच दोषी ठरवण्यात आले.   Print


News - World | Posted : 2019-07-06


Related Photos