छत्तीसगडमध्ये चकमकीत ४ नक्षल्यांचा खात्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / छत्तीसगड :
छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात मेचका ठाण्याच्या हद्दीतील जंगलात एसटीएफ पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक उडाली . पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केलं असून, चकमक अद्याप सुरूच आहे.  
प्राप्त  माहितीनुसार, मेचका ठाण्याच्या हद्दीतील जंगलात पोलिसांचे एसटीएफ पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीत पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केल्याचं समजतं. घटनास्थळावरून चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि त्यांच्याकडील शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. 
नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी एसटीएफ आणि डीएफनं संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पथकानं गोळीबार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.   Print


News - World | Posted : 2019-07-06


Related Photos