महत्वाच्या बातम्या

 कोंढाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा जि. प. उच्च प्राथमिक शाळेत गौरव सोहळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा कोंढाळा येथे गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजीत करण्यात आला. शैक्षणिक सत्र 2021-2022 रोजी आयोजीत शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल घोषीत करण्यात आला. एकून विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थी परिक्षेला बसलेले होते. त्यापैकी कुमारी सानी राकेश चौधरी, कुमारी अनुष्का ओमप्रकाश शेंडे ह्या दोन विद्यार्थी परिक्षा इयत्ता 5 वी साठी पात्र झालेल्या आहेत. शाळेत एका छताखाली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गुणगैरव करण्यात आले. शाळेचे उ. श्रे. मुख्याध्यापक अनील मुलकलवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. याप्रसंगी योगेदा ढोरे, संतोष टेमूर्ते, लालचंद धाबेकर, सुनील निवांत, कु रेखा चौधरी, कु माधुरी रामगुंडे, कु हिल्या, कु भिमाबाई हवरे, कु रानी गान्युडकर तथा शाळेतील सर्व वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos