गडचिरोली पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कक्षाला गळती


- दुसऱ्यांच्या निवाऱ्याची सोय करणारे कर्मचारी करतात पाण्यात काम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती मधे ५२ ग्राम पंचायती अंतर्गत विविध योजना आखणाऱ्या बांधकाम विभागाच्या कक्षाला गळती लागली आहे. यामुळे कर्मचारी पाण्यात बसून काम करीत असल्याचे दिसून आले.
पंचायत समिती मधील बांधकाम विभाग ५२ ग्राम पंचायतीना योग्य निवार्याची सोय व विविध शासकीय योजना पुरवत असतात. परंतु याच विभागातील कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात फाटलेल्या छपरा मूळे पाणी गळत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. पाणी गळत असल्यामुळे कामात अडथळा निर्माण होत असून येणाऱ्या लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन कराव लागत आहे. कागदपत्र , रेकार्ड खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे 'दुसऱ्याची घरे बांधणाऱ्या गवंड्याच्या घरावर फाटकी पाल" ही म्हण लागु झाल्याचे दिसत आहे. य़ा त्रासाला कंटाळून वरिष्ट अधिकाऱ्याकडे कित्येकदा तक्रार करून सुध्दा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-07-05