महत्वाच्या बातम्या

 नागरिकांनी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्यावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये राज्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २७ ऑक्टोंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या असून या याद्यांवर २७ ऑक्टोंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकरण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नवमतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती, नाव वगळणे, आधार जोडणी यासाठी ४ नोव्हेंबर रोजी आर्वी, ५ नोव्हेंबर रोजी देवळी, २५ नोव्हेंबर रोजी हिंगणघाट व २६ नोव्हेंबर रोजी वर्धा या चारही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.

सर्व मतदारांना मतदार केंद्रावर यादी तपासण्यासाठी उपलब्ध असेल. या शिबिरामध्ये मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांची मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी आपले नाव यादीमध्ये तपासावे किंवा त्यामध्ये दुरुस्ती असल्यास विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos