५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या


- तेली समाज संघटनेची मागणी,  नागाळा अत्याचार प्रकरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
    तालुक्यातील नागाळा येथील  अल्पवयीन ५ वर्षीय मुलीवर २२  जून रोजी एका नराधमाने पाशवी अत्याचार केला.   या घटनेचा निषेध करण्यासाठी आज  ५  जुलै रोजी  मुल  येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.   रॅली रामलीला  भवनाच्या पटांगनातून सुरूवात करण्यात आली. रामलीला भवन ते गांधी चौक  मुख्य  मार्गाने जात उपविभागिय कार्यालयावर मोर्चा धडकला.   या मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समिती चंद्रपूर च्या  वतीने योगेश समरीत यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या मोर्चात  जिल्ह्यातील तेली समाज मोठ्या संख्येने एकत्रीत आला होता.
 माणुसकीला काळे फासणाऱ्या  या घटनेतील जबाबदार अत्याचार करणाऱ्याला  फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मुख्य मागणी करण्यात आली. त्यासोबतच  खटला फास्ट ट्रक्ट कोर्टात चालविण्यात यावा , पिडीत मुलीची आर्थिीक परीस्थीती  गंभीर असल्याने शासनातर्फे अत्याधुनिक उपचार निशुल्क करण्यात यावे,पिडीत  मुलीच्या पुनर्वसनासाठी शासनाने तात्काळ २५  लाखाची मदत करावी, अश्या विविध  मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची  पुर्तता न झाल्यास संपुर्ण तेली समाज  घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करेल असा गर्भित इशारा तेली समाज संघटनेकडून करण्यात आला.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-05


Related Photos