राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गडचिरोलीचे पालकत्व


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नव्यानेच विस्तार करण्यात आलेल्या मंत्रीमंडळात जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी राजिनामा दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागले होते. अखेर राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आठ जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले आहेत. यामध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहिर करण्यात आले. अमरावतीचे पालकमंत्री म्हणून डाॅ. अनिल बोंडे, पालघरचे पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण, गोंदिया आणि भंडाराचे पालकमंत्री पद डाॅ. परिणय फुके, हिंगोली चे पालकमंत्री म्हणून अतुल सावे, वर्धाचे पालकमंत्री पद ना. सुधीर मुनगंटीवार ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डाॅ. संजय कुटे यांना पदभार देण्यात आला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-05


Related Photos