नव्यानेच रूजु झालेल्या पाथरी च्या ठाणेदारांनी अवैध धंद्यावर कसली कंबर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पाथरी :
स्थानिक पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारे जंगलात लपवून ठेवलेल्या दारूने भरलेल्या टाटा सफारी    गाडीला ताब्यात घेवुन गुन्हा दाखल केला आहे. नव्याने रूजु झालेले पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार  आल्या - आल्या पंधरा दिवस होताच अैैवध व्यावसायिकांवर कंबर कसली असुन पहीलीच मोठी कारवाई करताच अैवध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. 
पाथरी पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारे सावली तालुक्यातील करोली  जंगलात टाटा सफारी एम एच -४० -ए- ७००० क्रमांकाची  गाडी लपवुन ठेवलेली होती दारू तस्करांनी करोली हा भाग जंगलमय असुन याचाच फायदा घेत लपवुन ठेवलेली होती.  त्या गाडीत    बघीतले असता त्यात देशी दारूच्या ४६ पेट्या आढळुन आल्या . त्यांची अंदाजे  किंमत ४ लाख  ६०  हजार रू असुन व वाहनाची अंदाजे किंमत १ लाख  ५ हजार  असा एकुन ६ लाख १० हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला.   वाहन चालकावर कलम ६५ (इ) मुदाका अन्वये गुन्हा नोद करण्यात आला . सदर कारवाई ठाणेदार निलेश चवरे यांच्या मार्गदर्शनात दत्ता बोरडे , प्रविन पेन्दोर ,अशोक राउत, रूपेश सावे , विजय ढपकस यांनी केली.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-05


Related Photos