विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची ओढ असलेला जनतेचा नेता : अजय कंकडालवार


सामान्य कार्यकर्ता, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भुषविणारे जिल्हा  परिषदेचे आरोग्य समिती, शिक्षण समिती सभापती तसेच उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा राजकीय प्रवास तळागाळातील जनतेला माहित आहे. आपल्या १९ वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जनतेसाठी समर्पीत असलेला नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
अजय रामय्याजी कंकडालवार यांचा जन्म ५ जुलै १९८२ रोजी अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत सामान्य होते. त्यांनी बी.ए. द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतांनासुध्दा त्यांना सामाजिक कार्याची प्रचंड ओढ होती. गरजू, अडलेल्या लोकांची कामे करणे, विविध योजनांचा लाभ मिळवून देणे अशी कार्य त्यांची नित्यनेमाने सुरू होती. अल्पावधीतच सामाजिक कार्यात लोकप्रिय झाले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत आदिवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सन २००० मध्ये सक्रीय झाले. सामाजिक कार्य करतांनाच त्यांनी २००५ मध्ये इंदाराम ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. यामध्ये ते विजयी झाले. यादरम्यान गावातील विविध विकासात्मक कामांना त्यांनी गती दिली.
यानंतर २००७ मध्ये अजय कंकडालवार यांनी अहेरी पंचायत समितीची देवलमरी गणाची निवडणूक लढविली. यामध्ये त्यांनी विजय संपादन केला. पंचायत समिती अंतर्गत विविध योजना राबवून व नागरिकांपर्यंत पोहचून त्यांनी जनतेची मने जिंकली. जनतेच्या मनात अजय कंकडालवार यांचे नाव कोरल्या गेले. यानंतर त्यांनी २०१२ मध्ये देवलमरी - रेपनपल्ली  जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढविली. या निवडणूकीत अनेक मातब्बर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मात देवून तब्बल ४ हजार ८०० मते घेवून विजय मिळविला. यावेळी ते जिल्ह्यात सर्वाधित मताधिक्क्याने विजयी झालेले उमेदवार ठरले. याच कालावधीत २०१४ - १५ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीपद भुषविले. यादरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन केले. जिल्हाभरातील दुर्गम भागात भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 
२०१७ साली पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत त्यांनी अत्यंत महत्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या आलापल्ली - वेलगुर जि.प. क्षेत्रातून निवडणूक लढविली. यावेळीसुध्दा ते तब्बल ३ हजार ८०० मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांची जि.प. च्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली. याच वर्षी त्यांनी अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत संचालकपदी विराजमान झाले. 
सामाजिक, राजकीय भार पेलवतांना त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी, नोकरदार सर्वांच्या समस्यांकडे लक्ष दिले. प्रत्येकांचे निवेदन प्राप्त होताच सबंधित विभागाकडे पाठपुरावा करून त्यांनी सर्वांचे समाधान करण्याचे व्रतच जोपासले असल्याचे दिसून येते. अशा या जनतेला समर्पीत नेतृत्व असलेल्या अजय कंकडालवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-04


Related Photos