तडे गेलेल्या धरणाला ताडपत्रीची ठिगळं : प्रशासनाने लढवली अनोखी शक्कल


- ताडपत्री टाकून धरणाची गळती रोखण्याचे प्रशासनाचे प्रयत्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जालना :
जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात  झालेल्या मुसळधार पावसाने  सेलूद येथील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. या प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही पाणी गळती रोखण्यासाठी प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह तर थांबला नाहीच पण या अनोख्या शक्कलीमुळे प्रशासनाचे मात्र हसे होत आहे. 
१९७२ साली बांधलेल्या या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला तडे जाऊन पाणी गळती होत असल्याने परिसरातील नागरीक भयभीत झाले होते. त्यामुळे काल जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला भेट देऊन नदी क्षेत्रातील ४ गावातील नागरीकांना सुरक्षेचा उपाय म्हणून इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला. 
दरम्यान आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी प्लास्टिकची ताडपत्री लाऊन गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला असून सांडव्यातून होणारी गळती तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-04


Related Photos