कोयनगुडा जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पोहचणणर मंगळ ग्रहावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील उपक्रमशिल जि.प. प्राथमिक शाळा कोयनगुडा येथील विद्यार्थी व शिक्षकांची नावे थेट मंगळ ग्रहावर पोहचणार आहेत. यासाठी सर्वांना बोर्डींग पासही मिळाले आहेत.
अमेरीकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरीक्ष यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. त्याबरोबर स्टेनसिल्ड चिपवर आपली नावे पाठवून आपल्या खुणा सोडण्याची संधी ‘नासा’ ने जगभरातील जनतेला दिली आहे. नासा च्या पसाडेना (कॅलिफोर्निया) येथील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीतल्या मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलीकाॅन चिपवर मानवी केसांच्या एक हजाराच्या भागाइतक्या (७५ नॅनोमीटर) रूंदित आपण नोंदविलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. ‘रोव्हर २०२०’ हे यान ॲटलस व्ही ५४१ या राॅकेटच्या मदतीने अमेरीकेच्या फ्लोरीडा प्रांतातील कॅपकानावेराल येथील सैन्यदलाच्या तळावरून १७ जुलै ते ५ ऑगस्ट २०२० दरम्यान लाॅंच केले जाणार आहे. ते २०२१ च्या फेब्रुवारीत मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे. 
शाळेचे उपक्रमशिल, तंत्रस्नेही शिक्षक तथा मुख्याध्यापक विनीत पद्मावार यांनी आपल्या विद्यार्थ्यांना तसेच सहाय्यक शिक्षक वसंत ईष्टाम यांना ही संधी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-04


Related Photos