उमानूर - येर्रागड्डा जवळ ट्रकची महिंद्रा मॅक्सला धडक, ११ विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी


- आश्रमशाळेत जाण्यासाठी निघाले होते विद्यार्थी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी
: बोगटागुडम येथून आलापल्लीकडे जात असलेल्या महिंद्रा मॅक्स प्रवासी वाहनाला अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत ११ विद्यार्थी व काही प्रवासी जखमी झाल्याची घटना आज ४ जुलै रोजी सिरोंचा मार्गावरील उमानूर - येर्रागड्डा जवळ घडली आहे. यामध्ये २  विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महिंद्रा मॅक्स वाहनाने गडचिरोली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना आणण्यात येत होते. या वाहनात काही प्रवासीसुध्दा होते. यामुळे वाहनात प्रचंड गर्दी होती. अचानक समोरून आलेल्या ट्रकने महिंद्रा मॅक्स वाहनाला जोरदार धडक दिली. यामुळे वाहन उलटले. वाहनामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला. अनेक विद्यार्थ्यांना गंभीर इजा झाल्या आहेत. काही प्रवासीसुध्दा जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रकचालक ट्रकसह फरार झाला आहे.
नुकतेच शाळांना सुरूवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील आश्रमशाळूेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळांचे शिक्षक घेवून जात आहेत. खासगी वाहनांमध्ये प्रचंड गर्दी असतानाही ११ विद्यार्थ्यांना वाहनात कोंबण्यात आले. अपघातामध्ये जीव गेल्यास जबाबदार कोण राहिल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-07-04






Related Photos