अखेर....! संगीता आली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात , ताडगाव शाळेत मिळाला प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
आज   ३ जुलै रोजी  भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विणी सोणावने, साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी धुडेपल्ली येथील गेल्या एक वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या  संगीता लालसू वेळंजे हिच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पालकांशी संवाद साधला आणि लगेच तीला जि.प.उ.प्राथ.शाळा ताडगाव येथे शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम-४ नुसार वयानुरूप समकक्ष वर्गात इयत्ता सहावीला प्रवेशीत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी संगीताला मोफत पाठ्यपुस्तके आणि मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले. काही दिवसात आपण तीला ये - जा करण्यासाठी सायकल  उपलब्ध करून देणार असल्याचे सोरते यांनी उपस्थितांना सांगितले.
 प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अश्विणी सोणावने यांनी प्रत्येकांनी  बालकेंद्रित असण्याचे आवाहन केले. कारण व्यक्ती बालकेंद्रीत असला तर लहान मुलांना आनंद देऊ शकतो,आनंद हे प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्यास मदत करते आणि निरोगी पिढी निश्चितच संतुलीत राहतो अशी अपेक्षा व्यक्त केली.संगीता आणि तीच्या वडीलाच्या चेहऱ्यावर निश्चितच खुशी दिसुन येत होती.
 तसेच संगीताचा शोध घेऊन तीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी चांगदेव सोरते यांनी केलेल्या कार्याबद्धल गटशिक्षणाधिकारी अश्विणी सोणावने यांनी सोरते यांचे कौतूक कले.सर्वांनी शाळाबाह्य विरहीत तालुका करण्यासाठी प्रयत्न करावा असे केंद्रप्रमुख,बिआरसी कर्मचारी यांना सुचना केल्या.
       संगीताचा नाहक एक वर्ष वाया गेल्याची चुक पालकांच्या लक्षात आली.चुका सुधारण्याची तयारी ठेवली की यश गमविण्याची वेळ येत नाही,कारण प्रत्येकाला आनंदी ठेवणे जरी आपल्या हातात नसले तरी प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे निश्चितच आपल्या हातात असते. दरम्यान धुडेपल्ली गावचे माजी सरपंच पेका मासा मडावी,गावचे प्रतिष्ठीत नागरिक साधु बंडू गावडे, ताडगाव शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.झाडे,तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र भजभुजे,कु.सरोज मडावी, कुमरे,मडावी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-03


Related Photos