राहुल गांधीं राजीनामा देण्यावर ठाम , ट्विटरवरील प्रोफाईल बदललं


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची प्रत ट्विटरवर प्रसिद्ध केली. यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विटरवरून आपली काँग्रेस अध्यक्ष ही ओळखही हटवली. संसद सदस्य आणि काँग्रेस सदस्य इतकाच उल्लेख त्यांनी ठेवला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर राहुल यांच्या ट्विटर हँडलचे स्क्रीनशॉटस् व्हायरल होत आहेत.
राहुल यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या राजीनाम्यात आपण लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारल्याचे म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत आपण एखाद्या पक्षाविरोधात नव्हे तर विरोधी पक्षांसमोर उभ्या करण्यात आलेल्या संस्थांविरोधात लढलो, असेही राहुल यांनी म्हटले. 
तत्पूर्वी राहुल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदात कोणताही रस उरला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षाने थोडाही उशीर न करता नव्या अध्यक्षाची निवड करायला पाहिजे. मी यापूर्वीच माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकारिणीची लवकरात लवकर बैठक व्हायला पाहिजे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले होते.   Print


News - World | Posted : 2019-07-03


Related Photos