अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी झळकणार भारताचा तिरंगा ध्वज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मिशिगन :
मिशिगनमध्ये ४ जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या रॅलीत हिंदुस्थानचा तिरंगाही झळकणार आहे. ‘ऍन आर्बर मराठी मंडळ’ (ए2एमएम) या रॅलीत सहभागी होणार असून यात पारंपरिक वेशभूषा परिधान करून हिंदुस्थानी नागरिक सहभागी होणार आहेत. यात शिव शार्दुल पथकातर्फे ढोल, ताशा वाजणार आहेच पण लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
‘ऍन आर्बर जेसीज फोर्थ जुलै परेड’ असे या रॅलीचे नाव असून यात हिंदुस्थानी आणि मराठमोळी संस्कृती आम्हाला दाखवता येणार आहे. अमेरिकन आणि हिंदुस्थानी संस्कृतीचा मेळ या रॅलीत आम्ही घालणार आहोत, असे ऍन आर्बर मराठी मंडळाचे संस्थापक आणि विश्वस्त भूषण कुलकर्णी यांनी सांगितले. हिंदुस्थानी मूळ असलेल्या लोकांनी, मराठी संस्कृती वाढावी यासाठी २००६ मध्ये ‘ए2एमएम’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेने २०१४  साली मिशिगनमध्ये मराठी शाळाही सुरू केली आहे.  Print


News - World | Posted : 2019-07-03


Related Photos